Friday, June 11, 2010

कळ्वण शहराचा पुर्व इतिहास...

कळ्वण शहराचा पुर्व इतिहास...    
        मॊगलांनच्या काळात आजचॆ नाशिक हॆ जिल्ह्याचॆ ठिकाण नव्हते तर संगमनेर, बागलाण आणि गाळना ही जिल्ह्याची तिन ठिकाणॆ होती. मोगलकाळात  नाशिक हे तालुक्याचे ठिकाण होते. त्याला परगने गुलाशनाबाद असे म्हणत. (नाशिकचे जुने नाव "गुलाशनाबाद" होते.)
        मोगल काळात आणि मोगल पुर्वकाळात काही गावांना आज आहेत ती नावे आधी नव्हती. ती काही वॆगळिच होती. अभॊणॆ, ता. कळ्वण येथे एका रजपूत गृहस्थाकडे ताम्रशासन सापडला तो "एपिग्राफिया इंडिका" या नियतकलिका मध्ये श्री पाठक या गृहस्थाने प्रसिद्ध केला आहे यात 'भोगवर्धन' आणि 'कल्लावन' या दोन गावांचा उल्लेख आहे. 'भोगवर्धन' म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातिल "भोकरधन" होय, आणि  'कल्लावन' म्हणजे आजचे 'कळ्वण' होय, हे बागलाणात येत होते. पुढे पेशवाईनंतर कळ्वण, बागलाण अलग-अलग झाले. पूर्वी कळ्वण येथे कोळी लोकांची खुप मोठ्या प्रमाणात वस्ती होती त्यामुळॆ याला कॊळिवन असे म्हणत. पुढे याच कॊळिवनावरूण "कळ्वण" हे नाव पडले. असे थोर इतिहासकार संशोधक श्री. सेतु माधवराव पगड़ी यांनी त्यांच्या भाषणात सांगितले होते.
(ऐतिहासिक माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न.)
www.kalwan.com (Suresh S Raundal )